सध्या ठोंबरे यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय केज मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालकाच्या बाजूच्या दिशेने दगड फेकण्यात आले. यामुळे गाडीची काच फुटली. नंतर तो दगड संगीता ठोंबरे यांचे चालक किशोर मोरे यांना लागला. या दगडफेकीमध्ये दोघेही जखमी झाले आहेत.
ऋषी गदळे या कार्यकर्त्याच्या घरी चहापानासाठी जीपमधुन जात असताना बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेतील विजय उत्तमराव गदळे यांनी ठोंबरे यांच्याशी असभ्य भाषेत बोलुन त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस सध्या हल्ला का करण्यात आला याचा तपास करत आहेत.