बीड: जिल्ह्यातील पाटोदा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाटोदा तहसील कार्यालयातून चोरट्याने चक्क संगणक चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीचा प्रकार उघड होऊ नये यासाठी तहसील प्रशासनाचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा तहसील कार्यालयातील महसूल विभागात असणाऱ्या संगणकाची चोरी झाली आहे. तेथील तहसील प्रशासनाने चोरीचा प्रकार उघडकीस होऊ नये यासाठी प्रयत्न केला. मात्र ही बाब नायब तहसीलदार गणेश दहिफळे यांच्या लक्षात येताच त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली आहे. याबाबत तपास पोलीस करत आहेत.