छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यापासून सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्या नागरिकांन सर्दी, खोकला, ताप, अपचनाचा त्रास, हातपाय दुखणे अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. काहींचा ताप पाच ते सहा दिवस राहत असल्याच्या तक्रारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे व्यायामासह योग्य आणि संतुलित आहार घेण्याच सल्ला डॉक्टर देत आहेत.
बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी- अधिक होत आहे. दुपारी कडक ऊन तर सकाळ आणि सायंकाळी दमटपणा असल्याने आजार बळावत आहेत. विशेषतः रोगप्रतिकारशक्त कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे दररोज ओपीडीमध्ये दहाच्या आसपास रुग्ण सर्दी, खोकला आणि तापाच्या आजारांचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. आहारात डिंकाचे लाडू, तूप, बाजरी, मका, पालेभाज्या, मांसाहार तसेच हिंग, धने, जिरे, तेजपत्त यांसारख्या मसाल्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन वाढवावे, असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना सर्दी खोकला आणि तापाच्या समस्या जाणवत आहेत.