chhatrapati Sambhajinagar : कायगाव : छत्रपती संभाजीनगरमध्ये शालेय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गंगापूर तालूक्यातील जामगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशे, म्हणजे त्या विद्यार्थ्याने मम्मी-पप्पा माफ करा असे वहीवर लिहीले होते.
ओमकार दत्तात्रेय पाठे (वय १४) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. जामगाव येथील एका खासगी शाळेच्या इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ओमकारने २९ डिसेंबर रोजी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. धोका म्हणून मी चाललो. मम्मी पप्पा मला माफ करा. मी शेवटपर्यंत तुम्हाला साथ देवू शकलो नाही. पण तुम्ही टेंशन नका घेऊ मी कायम तुमच्या सोबत राहीन, असे मजकूर लिहून घरातील पंख्याला दोरीने गळफास घेतला.
ओमकार एकुलता एक मुलगा. त्याने गळफास घेतला त्यावेळी घरी कुणीही नव्हते. या घटनेने गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शकील शेख हे करीत आहे.