हिंगोली : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तगडा पोलिसबंदोबस्त लावून तपासण्या केल्या जात आहेत. याच नाकाबंदीदरम्यान, हिंगोली शहरातून एक कोटींची रोख रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या तपासात एका कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढचा तपास सुरू आहे. दरम्यान, ही रोकड बँकेची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हिंगोली शहरात याच नका बंदीदरम्यान बस स्थानक परिसरात पोलिसांना एका इनोवा कारमध्ये 1 कोटी 40 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. ही रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. आचारसंहिता लागू असताना एवढी रोकड कशी आली याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. दरम्यान, ही रोख रक्कम बँकेची असल्याच सांगण्यात येत आहे.