Buldhana News : बुलढाणा : राज्यातील सोयाबीनला सध्या योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यांने रोडवर सोयाबीनची उधळण करत आंदोलन केले होते. आता पुन्हा बुलढाणा येथील एका संतप्त शेतकाऱ्याने हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शन केलं.
रवी महानकार असे या संतप्त शेतकऱ्यांचे नाव असून हा शेतकरी अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा या गावचा रहिवासी आहे. सोयाबीनला प्रती क्विंटल 6 हजार रुपये दर मिळावे, अशी शेतकऱ्याची मागणी होती. मात्र योग्य बाजारभाव मिळत नसल्याच्या रागातून त्याने रस्त्यावर सोयाबीन फेकून देत निदर्शने केली. या शेतकऱ्याने आतापर्यंत 100 क्विंटल सोयाबीन विकल्याच म्हटल आहे. मात्र मिळालेला मोबदला हा अतिशय कमी असून आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी रवी महानकर याला ताब्यात घेतले .
यंदा सुरुवातीलाच पाऊस एक महिना उशिराने आला. अनेक ठिकाणचे सोयाबीनचे झाड वाढलीच नव्हती. त्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. अनेकांचे हाता तोंडाशी आलेले पीक हिरावून गेल्याने हिरमूड झाला. अनेकांनी आपल्याकडे असलेल्या पाणीसाठ्याच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा विशेष परिणाम सोयाबीनच्या पिकावर झाला नाही. त्यात येलो मोझॅक नावाचा बुरशीजन्य रोग सोयाबीनवर पडला. त्यामुळे सुद्धा सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.