Buldhana Crime News : बुलढाणा : जागेच्या वादातून मेहकर तालुक्याच्या डोनगाव येथे दोन गटात तुफान राडा झाला. ज्यात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षांसह 10 ते 12 लोकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोयत्याने मारहाण करण्यात आली. जखमींवर सध्या मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले, देवेंद्र आखाडे, वैभव आखाडे यांच्यासह पाच जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.
नेमक काय घडलं?
स्वाभिमानी शेतकरी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकारी गजानन सातपुते यांच्या दुकानात गेले होते. यावेळी ज्ञानेश्वर टाले यांनी सातपुते यांना दुकान खाली करण्याचे सांगितले. मात्र, त्यांनी नकार देताच ज्ञानेश्वर टाले आणि त्यांच्या साथीदाराने बळजबरीने दुकान खाली करण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात वाद झाले. दोन्ही बाजूने हाणामारी सुरु झाली. याचवेळी थेट कोयत्याने मारहाण करण्यात आली. यात एक जण गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे दोन्ही गटाचे लोकं समोर आल्याने तुफान राडा पाहायला मिळाला. यावेळी महिला देखील जखमी झाल्या आहेत.