छत्रपती संभाजीनगर: उद्यापासून (दि. ६) मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. त्यापूर्वी खासदार अशोक चव्हाण आणि संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राज्य सरकार मराठा आरक्षण आणि सगे सोयरेबाबत काय काम करत आहे, याबद्दलची माहिती जरांगे यांना दिली आहे.