छत्रपती संभाजीनगर : आज राज्यातले बडे नेते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाते उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित असणार आहेत. त्यांच्यासह इतर पक्षांचे नेते अनेक मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्याचं कारण म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचे आज लग्न आहे.
अंबादास दानवे यांच्या मुलाचा विवाहसोहळा
अंबादास दानवे यांच्या मुलाचा धर्मराज दानवे यांचा विवाहसोहळा आज संध्याकाळी आयेजित करण्यात आला आहे. त्यामुळे या लग्नाला राज्यातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित असणार आहे. शहरातील बीड बायपास वरील लॉन्समध्ये लग्न सोहळा पार पडत आहे. या लग्नासाठी अनेक राजकीय नेत्यांसह, उद्योजक, उपस्थित राहणार आहेत. याच लग्न सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस संध्याकाळी शहरात येणार आहे. तसेच,रात्री 8.30 वाजता विमानाने पुन्हा मुंबईला रवाना होतील.
मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा
संध्याकाळी 06.30 वा. मुंबई येथून शासकीय विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील. त्यानंतर 07.15 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे पोहोचतील त्यानंतर लग्नस्थळी पोहोचतील. संध्याकाळी 07.30 वाजता विधानपरिषद, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. 08.30 वाजता विमानाने मंबईकडे रवाना होतील.
उपमुख्यमंत्री फडणवीसांचा दौरा
संध्याकाळी 06.40 वाजता विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे पोहोचतील. संध्याकाळी 07.00 वाजता डिवाईन सिटी बीड बायपास छत्रपती संभाजीनगर येथे आगमन. 07.00 वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. 08.15 वाजता मंबईकडे रवाना होतील.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला व्हीआयपी उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने शहर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. विमानतळापासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलीस असणार आहे.