जालना: जालनातील बदनापूरमधील तहसिलदारांना व महसुल सहायक लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तब्बल 30 हजारांची लाच घेताना जालना एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले आहे. एसीबीच्या पथकाने लाचेची रक्कम जप्त केली असून, या दोघांविरूद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सुमन मोरे आणि निलेश गायकवाड अशी त्यांची नाव आहेत. 3 जानेवारी रोजी तक्रार दाखल होताच सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बदनापूर तहसील कार्यालयात या दोघांनाही रंगेहाथ पकडले. त्यामुळे जालन्यासह राज्यातील महसूल विभागामधील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
कोणत्या प्रकरणात लाच मागितली
तक्रार दाराने दाखल केलेल्या वारसा तक्रारीनुसार, हक्कानुसार भोगवटादाराची नोंद घेण्यासाठी त्यांनी ही लाच घेतल्याच समोर आले आहे. रामखेडा शिवारातील गट क्रं. 85, 86 व मौजे रामखेडा शिवारातील गट क्रं. 9 मधील शेत जमीन आजोबांच्या नावावरील जमीन वारसाने एकत्रित कुटुंब कर्ता म्हणून चुलत्याच्या नावे सातबाऱ्यावर भोगवटदार म्हणून नोंद करण्यात आली होती. कुटुंब कर्ता म्हणून घेतलेली नोंद कमी करून इतर वारसांची नावे सातबाराच्या उताऱ्यावर नोंद कमी करून इतर वारसांची नावे सातबाऱ्यावर लावून घेऊन फेर नक्कल देण्याकरीता तहसीलदार व महसुल सहाय्यकाने लात मागिती होती.