पाटोदा (बीड) : मतदानासाठी गावी निघालेल्या तरूणाचा अपघातात मृत्यू झाला. पाटोदा तालुक्यातील खेरला या गावचा रहिवासी असलेल्या अंगद रामहरी नागरे असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे.
अंगद नागरे हा तरूण लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 12 मे ला गावी निघाला होता. त्यावेळीच त्याच्या दुचाकीला अपघात होऊन तो जागीच मृत्यू पावला. तर सोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाला. थेरला या गावचा रहिवाशी अंगद नागरे हा पुणे येथे कंपनीमध्ये कामासाठी गेलेला होता. तो मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानाकरता परत येत असताना काहीच वाहन न मिळाल्याने तो त्याच्या दुचाकीवरून गावी निघाला असता घोडनदी शिरूर नजीक त्याच्या दुचाकीला अपघात झाला.
दरम्यान, या अपघातात अंगद नागरे हा जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असलेला यशराज खेडकर हा गंभीर जखमी झाला असून, त्याला नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी गावात कळताच सर्वत्र शोक व्यक्त केला.