औसा : लातूर जिल्ह्यातील औसा शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर असतात त्यामुळे वाहतुकीसह लहान मुले, वृद्ध व महिला यांना रस्त्याने फिरनेही जिकरीचे झाले आहे. शहरातील कुरेशी गल्लीत शनिवारी एका चिमुकलीवर झालेल्या मोकाट कुत्र्याच्या हल्यात ची,चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.
शहरातील कुरेश गल्लीतील आयना सल्लाउद्दीन कुरेशी ही तीन वर्षाची मुलगी घरा बाहेर खेळत होती. एका मोकाट श्वानाने तिच्यावर हल्ला केला. तिला अक्षरशः तोंडात धरून फरफटत नेले. तिचे लचके तोडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मुलीला तेथील लोकांनी या कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात अक्षरशः भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वारंवार या मोकाट श्वानांच्या हल्ल्यामुळे शहरातील लहान मुले, महिला व वृद्ध जखमी होत असतांना पालिका प्रशासन कांहीच उपाययोजना करीत नसल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कल्याणमध्ये आठ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला
कल्याण पश्चिमेकडे असलेल्या शिवाजीनगर परिसरात रा- हणाऱ्या एका आठ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. त्याच्या गुप्तांग आणि तोंडाला कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अर्थव हा मोहिंदर सिंग काबूल सिंग शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता अथर्व ट्यूशनहून घरी परतत होता. घर जवळच्या गल्लीतून येत असताना मागून आलेल्या भटक्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक झडप घातली.