छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एका पोलीस अंमलदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील हर्सुल जेलमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराचा लाकडी दांडक्याने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हर्सुल जेल परिसरातच हत्या करण्यात आल्याने मोय्ही खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ जाधव असे मयत पोलीस अमलदाराचे नाव आहे
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिद्धार्थ जाधव हे हर्सुल कारागृहातच कार्यरत होते. रविवारी रात्री जाधव आणि त्यांचा मित्र सचिन दाभाडे याच्यासोबत हर्सुल जेल परिसरातील मागच्या जागेत दारु पित बसले होते. यावेळी आलेल्या काही हल्लेखोरांनी सिद्धार्थ आणि त्यांचा मित्र दाभाडे यांच्यावर हल्ला केला.
सिद्धार्थ यांना लाकडी दांड्याने जबर मारहाण करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र दाभाडे हा जखमी अवस्थेत पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. दाभाडे सध्या बेशुद्धावस्थेत असून घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा खरच कोणी केलेला हल्ला होता, की त्यांच्या मित्र सिद्धार्थनेच यांना याना मारण्याचा कट रचला होतं. याचा पोलीस शोध घेत असून घटनेचा पुढील तपास हर्सुल पोलीस करत आहेत.