लातूर : लातूरच्या मोतीनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षांच्या चिमुकलीला जन्मदात्या बापानेच गळफास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर जन्मदात्या बापाने स्वत:लाही संवपलं आहे. अभय भुतडा (वय 35 ) असं मृत बापाचं नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज बुधवारी सकाळी लातूर शहरातल्या मोतीनगर भागात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच लातूरच्या गांधी चौक पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामा केला आहे. या घटनेत मृत अभय भुतडा या निर्दयी बापाने पोटच्या सहा वर्षीय चिमुकलीला गळफास दिला आहे. तर स्वतःही घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पुढील तपास गांधी चौक पोलीस करत आहेत.