उमरगा : लातुर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका ५२ वर्षीय नराधमाने ४ वर्षाच्या चिमुकलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना १३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल देवेंद्र कांबळे (वय-५२ रा. बसवकल्याण, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीला संतप्त झालेल्या जमावाने बेदम मारहाण केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री चिमुकलीची आई रात्रीच्या वेळी स्पावयंपाक करत होती. तेव्हा चिमुकली आपल्या भावंडांसोबत बाहेर खेळत होती. त्यावेळी कर्नाटकातील अनिल कांबळे या नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीला खांद्यावर उचलून नेत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, मुलीने आरडाओरड केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी नराधम आरोपीला पकडून बेदम मारहाण केली .
या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिसानी घटनास्थळी धाव घेत. स्थानिकांनी मारहाण केलेल्या जखमी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. आरोपीच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास पोलिस अनुसया माने या करत आहेत.