छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील या दुर्दैवी घटनेनी खळबळ उडाली आहे. आईने गॅसवर ठेवलेले गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने अवघ्या पंधरा महिन्यांची चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील उस्मानपुरा भागात ही घटना घडली आहे. नुरेन अजिम सय्यद असे मयत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने परिसारत हळहळ व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अजिम सय्यद हे संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागात राहत आहेत. त्यांना पंधरा महिन्याची नुरेन नावाची मुलगी होती. दरम्यान, नुरेनाच्या वडिलांसाठी आईने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. मात्र, ते गॅसवर ठेवलेलं पातीलं उलटल्याने त्याच्यातल पाणी नुरेनाच्या अंगावर पडल्याने चिमुकली गंभीर भाजली. आई-वडिलांनी तिला तात्काळ शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर, परिसरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जमादार आर. पिरंगे करीत आहेत.