नांदेड : नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अवघ्या ६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केले आहे. दशरथ उर्फ फुलाजी पांचाळ असं आरोपीचे नाव आहे. या घटनेने नांदेड जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणारी मुलगी आपल्या घराशेजारी असलेल्या शाळेसमोरील मैदानात खेळत होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ही मुलगी मैदानातच खेळत होती मात्र, खेळता-खेळताच ती गायब झाली.
संध्याकाळी ६ वाजेपर्यंतही मुलगी परत न आल्याने कुटुंब घाबरून गेले. कुटुंबीय आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून तिचा शोध सुरू केला. तरीही मुलगी सापडली नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुदखेड पोलीसांनी रात्रभर तिचा शोध घेतला पण मुलगी सापडली नाही. त्यानंतर १५ जानेवारी रोजी सकाळी या मुलीचा मृतदेह मुदखेड जवळच्या उमरी रोडवर आढळून आला.
गावापासून १२ किमी दूर झुडुपात चिमुकलीचा मृतदेह फेकला
गावापासून १२ किलोमीटर दूर मुख्य रस्त्याशेजारी झुडुपात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या चिमुकलीवर अत्याचार करून अज्ञात नराधमाने तिची हत्या केल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी अत्याचार, हत्या आणि अन्य कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपींना नांदेड पोलिसांकडून अटक.#Nandedpolice #DGPMaharashtra @ChakankarSpeaks pic.twitter.com/NtMFzgaukm
— नांदेड पोलीस – Nanded Police (@NandedPolice) January 21, 2024