धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांची पीक कर्जखात्याचे नूतनीकरण केले नसल्याच्या कारणावरुन जवळपास 180 शेतकऱ्यांची बँक खाते होल्डवर ठेवण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या चालू पीक कर्जाचे नूतनीकरण न केल्याने बँकेने संबंधित खाती होल्डवर ठेवली आहेत. दरम्यान संबंधित शेतकऱ्यांनी नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन बॅंकेच्या वतीने करण्यात आले असून एसबीआयच्या शाखेने तब्बल 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज खात्याचे नूतनीकरण केले. परंतु, याच परिसरातील 180 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्ज खात्याचे नुतनीकरण न केल्याने 180 खाते बँकेकडून होल्ड करण्यात आल्याची माहिती मॅनेजरने दिली आहे.