जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. येणा-या 17 सप्टेंबरपासून जरांगे पाटील आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने तापू शकतो. तसे घडल्यास यावर भाजप आणि महायुती सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी याआधी 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत.