सोलापूर: प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वलसंगकर यांनी आत्महत्या प्रकरणी सध्या पोलिस कसून चौकशी करत आहेत. डॉ. शिरीष वलसंगकर यांनी रुग्णालयाच्या प्रशासक मनीषा मुसळे-माने यांच्याकडून छळ होत असल्याचे सूसाईड नोटमध्ये लिहिले होते. पोलिसांनी मनीषा यांना अटक केली असून या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. डॉ. वलसंगकर यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा यांचा रुग्णालयात खूप दबदबा होता. तिच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काडीसुद्धा हलत नव्हती, कर्मचारी तिला घाबरत होते. हि बाब डॉ. वलसंगकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः रुग्णालयात लक्ष देण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, आपला दबदबा कायम रहावा असे मनीषा हिला वाटत होते. दरम्यान, मनीषा काळ्या जादूचा अवलंब करत असे, अमावास्येच्या दिवशी मनीषा रुग्णालयातून रिक्षाने बाहेर जात असे आणि लिंबू आणि काळ्या बाहुल्या घेऊन येत असे.
डॉ. वलसंगकर आणि मनीषा यांच्यातील तणाव वाढत होता, डॉ. वलसंगकर यांचा रुग्णालयातील कारभारात वाढत्या सहभागामुळे मनीषा यांना धोका वाटत असल्याचे वृत्त आहे. मनीषाने डॉ. वलसंगकर यांना एक ईमेल देखील पाठवला होता, ज्यामध्ये त्यांनी तिचा पगार कमी केल्यास आणि तिचे अधिकार कमी केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान, डॉ. वलसंगकर यांनी तिला रुग्णालयात बोलावून तिची समजूत काढली होती. डॉ. वलसंगकर यांच्या मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक चौकशी करत आहेत आणि पुरावे गोळा करत आहेत.