अजित जगताप
सातारा : जुनी पेन्शन योजनांच्या लिपीकवर्गीय कर्मचारी विविध मागण्यासाठी दि. १४ मार्चपासून बेमुदत संपावर जात आहेत. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने लिपीकवर्गीय कर्मचा-यांचे प्रश्नांसर्भात वेळोवेळी आंदालेन केलेले असून सरकारसोबत बैठका होऊन चर्चा केलेली आहे. परंतु आज अखेर जुनीपेन्शन योजनांच्या मागणीसह लिपीकवर्गीय कर्मचा-यांचे वेतन तुटीचे व इतर प्रश्न सुटलेले नाहीत.
लिपिक वर्गीय कर्मचा-यांचे समान काम समान वेतन आणि समान पदोन्नती टप्पे यासाठी समिती गठित करण्यात आलेली होती. सर्व विभागातील लिपिक वर्गीय कर्मचा-यांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाबत नविन पेन्शन योजना (एन पी एस )बंद करुन जुनी पेन्शन योजना, जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचा-यांचे ग्रेड पे आणि सातवे वेतन आयोगातील तूटी दुर करणे. समान काम समान पदोन्नतीचे टप्पे धर्तीवर लिपीकांचे पदोन्नतीचे दुरुस्ती करण्यात यावी.
सुधारीत आकृती बंदामध्ये लिपीकांची पदे वाढविणे. जिल्हा परिषद कर्मचा-यांना शासकिय कर्मचा-यांप्रमाणे गृहबांधणी व मोटारसायकल अग्रीम व कॅशलेश वैदयकीय सुविधा मिळणे, सहावे वेतन आयोगाचे हप्ते मिळणे अशा मागणीसाठी राज्य मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, गिरीश दाभाडकर व संघटनेचे मान्यवर पदाधिकारी यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव पंचायत समितीच्या कार्यालयात गट विकास अधिकारी उदयसिंह साळुंखे यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनावर मान्यवरांच्या सह्या आहेत. यावेळी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य प्रवक्ता मारुती जाधव, सचिन शिंदे, नानासाहेब खाडे, गायकवाड, भिसे, पवार, तुकाराम खाडे व संघटनेचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी अधिकार उपस्थित होते.