मुंबई : राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा आधूनमधून सुरुच असते. अशातच आता मातोश्री च्या घराबाहेर रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. त्याबॅनर वर पुढचा मुख्यमंत्री रश्मी ठाकरे अशा आशयाचा उल्लेख केला आहे. सध्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे.
आज सोमवार 23 सप्टेंबरला रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवस आहे. वाढदिवस निमित्ताने युवा सेना कडून मातोश्री बाहेर पुढच्या मुख्यमंत्री आपल्या परिवाराचाच त्याचे प्रतिबिंब तुमच्यात ही दिसते रश्मीताई ठाकरे आपणास वाढदिवसाच्या तेजस्वी शुभेच्छा अशा पद्धतीने युवा सेना कडून शुभेच्छा देण्यात आले आहे.
पुढील काही दिवसात आचारसंहिता लागू होणार आहे. त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल याबाबतच्या चर्चेना जोर धरला आहे.
दरम्यान, राज्यातील राजकारणात जेव्हा कधी महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरु होते त्यावेळी रश्मी ठाकरे यांचे नाव समोर येत असतं. आता अशातच पुन्हा एकदा मातोश्री परिसराबाहेर रश्मी ठाकरे पुढचा मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागल्यानंतर महाविकार आघाडीमध्ये याचे पडसाद काय उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.