पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज आहे. मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे अशा 13 मतदारसंघांत मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान झाले आहे. कल्याणमध्ये 5.39 टक्के, भिवंडीत 4.86 टक्के, धुळ्यात 6.92 टक्के तर दिंडोरीत 6.40 टक्के मतदान झाले. उत्तर मुंबईत 6.19 टक्केा मतदान झाले आहे.
पहा मतदारसंघाय आकडेवारी
* धुळे- 6.92
* दिंडोरी- 6.40
* नाशिक – 6.45
* पालघर- 7.95
* भिवंडी- 4.86
* कल्याण – 5.39
* ठाणे – 5.67
* मुंबई उत्तर – 6.19
* मुंबई उत्तर प. – 6.87
* मुंबई उत्तर पूर्व – 6.83
* मुंबई उत्तर मध्य – 6.01
* मुंबई दक्षिण मध्य- 7.79
* मुंबई दक्षिण – 5.34