मुंबई : आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यात घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. आज सकाळी मंत्रीमंडळाची बैठक आयोजित केली आहे. ही आचारसंहिता लागू होण्याची चाहूल असल्याचे बोलले जात आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणूक ही अटीतटीची असणार आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीने ही चांगलीच कंबर कसली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असे संकेत दिले आहेत की, येत्या दोन तीन दिवसात आचारसंहिता लागू होणार असून दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु होणार आहे.
दरम्यान, महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे. आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. गेल्या आठवड्यात दोन दोन मंत्रीमंडळ बैठका होताना पाहायला मिळाल्या. अशातच मंत्रिमंडळ बैठकीत अधिक निर्णय घेतले जात आहेत.