मुंबई : (Maharashtra Budget 2023) राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा (budget that will guide the state’s progress) विरोधकांच्या स्वप्नांची दशा करणारा, (shatter the dreams of opponents) जनतेला आनंद देणारा आणि विरोधकांचा आनंद हिरवणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन -सुधीर मुनगंटीवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करुन मुनगंटीवार म्हणाले की, ”फडणवीस यांनी मांडलेल्या पंचामृत सूत्रानुसार सर्वसामान्यांचा विकास व महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे. अमृत काळाचं हे प्रथम वर्ष आहे. विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारताला विश्व कप्तान बनविण्यात महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग नक्की असेल, त्या दिशेने नेणारा हा संकल्प आहे.”
आज मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, तरुण, नोकरदार, उद्योगपती, व्यावसायिक, या सर्वच बाबींचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. असा दावा करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास पुढील वर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमांसाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले.
राज्यातील शेतकऱ्याकरीता महासन्मान योजना, अंगणवाडी सेविकाना मानधन वाढ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात भरीव वाढ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन, महिलांसाठी लेक लाडकी योजना निश्चितच दिलासा देणाऱ्या आहेत. असेही त्यांनी सांगितले.