मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी, 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
दहावीच्या निकालासंदर्भातील बहुतांश तयारीही बारावीच्या निकालासोबत पूर्ण झाली आहे. यामुळे सोमवारी, 27 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. या निकालासंदर्भातील घोषणा आणि माहितीही लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा यंदा मार्च महिन्यात घेतली होती. यंदा या परीक्षेचे पेपर तपासणी आदी कामे वेळेत पूर्ण करण्यात आल्याने हा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याऐवजी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लावला जाणार असल्याची तयारी मंडळाकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. 21) रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निकालाची तारीख जाहीर केली असल्याचेही सांगण्यात आले.