Maharashtra Bhushan | मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा नवी मुंबईच्या खारघरमधील सेन्ट्रल पार्क मैदानावर पार पडला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला तीन मोठे विचार दिले. शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, ती पुढे लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके यांनी देखील देशाला पारतंत्रयातून मुक्त करण्यासाठी लढा दिला.
दूसरा भक्तीचा विचार महाराष्ट्राने भारताला दिला. संत तुकाराम महाराज ते रामदास स्वामी यांनी देखील भक्तीचा मार्ग दाखवला. तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा वारसा देशाला दिला आणि आता आप्पासाहेब धर्माधिकारी हे तिन्ही विचार त्यांच्या माध्यमांतून पुढे नेत आहेत असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी 20 लाखांहून अधिक श्रीसेवक उपस्थित…
तर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन आम्ही धन्य झालो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी 20 लाखांहून अधिक श्रीसेवक उपस्थित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics News : मुख्यमंत्री पद देऊ : अजित पवारांना आठवलेंची खुली ऑफर
Loni Kalbhor News : लोणी काळभोरच्या सरपंचपदी योगेश काळभोर यांची बिनविरोध निवड..!