बीड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येत आहे. अशातच आता बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. डॉ. ज्योती मोरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. मात्र, बीडमधून बजरंग सोनवणे यांनी तिकीट मिळाले आहे.
दिवंगत नेते विनायक मोटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश केला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितमध्ये मेटे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
बीड विधानसभा मतदारसंघातून ज्योती मेटे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे तुतारी चिन्हावर त्या बीड विधानसभेच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबरोबच ज्योती मेटे यांच्यासह सलीम पटेल आणि बाळासाहेब खोसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील, आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे… pic.twitter.com/hYhaOhrw8o
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 20, 2024