पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज आहे. मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे अशा 13 मतदारसंघांत मतदान होणार आहे.
देशातील 49 जागांवर दुपारी एक वाजेपर्यंत 36.73 टक्के मतदान झाले आहे, तर राज्यातील 13 मतदार संघात सरासरी 27.78 टक्के मतदान झाले आहे.
पहा मतदारसंघाय आकडेवारी
– धुळे- 28.73 टक्के
– दिडोरी- 33.25 टक्के
– नाशिक – 28.51 टक्के
– पालघर- 31.06 टक्के
– भिवंडी- 27.34 टक्के
– कल्याण – 22.52 टक्के
– ठाणे – 26.05 टक्के
– 2 मुंबई उत्तर – 26.78 टक्के
– मुंबई उत्तर पश्चिम 28.41टक्के
– मुंबई उत्तर पूर्व 28.82 टक्के
– मुंबई उत्तर मध्य 28.05 टक्के
– मुंबई दक्षिण मध्य- 27.21 टक्के
– मुंबई दक्षिण 24.46 टक्के