Land Records News : पुणे : शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शेत जमिनीची इत्यंभूत माहिती सातबारा दाखवतो. शेत जमिनीची खरेदी विक्री करताना हा उतारा आवश्यक असतो. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, शासकीय कामासाठी, कर्ज घेण्यासाठी सातबारा उतारा आवश्यक असतो. या सातबारा उताऱ्याबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जमिनीबाबत इत्यंभूत माहिती देणारा सातबारा आता मराठी भाषेसह अन्य २४ भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र असे एकमात्र राज्य बनले आहे, ज्यामध्ये असा प्रयोग राबवण्यात आला आहे. असा प्रयोग राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. Land Records News
डिजिटल इंडिया लॅँड रेकॉर्ड अॅक्शन प्रोग्रामनुसार हा सातबारा उतारा अन्य भाषांमध्ये…
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय स्थायिक झाले आहेत. या परप्रांतीयांना देखील सातबाराचे वाचन करताना अडचण येऊ नये, त्यांना देखील सातबारा उतारा समजावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या घडीला राज्यात दोन कोटी ६२ लाख सातबारे उतारे उपलब्ध आहेत. त्यामध्ये चार कोटी खातेदार आहेत. उपलब्ध उताऱ्यांपैकी दोन कोटी ५८ लाख सातबाऱ्यांवर फेरफार नोंदी आणि अन्य कामकाज सुरू आहे. महाराष्ट्रात तमिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, गुजरात आदी राज्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्याला आहेत. या नागरिकांना त्यांच्या भाषेतील सातबारा मिळणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लॅँड रेकॉर्ड अॅक्शन प्रोग्रामनुसार हा सातबारा उतारा अन्य भाषांमध्ये असावा, असे सुचविण्यात आले आहे. Land Records News
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लॅँड रेकॉर्ड अॅक्शन प्रोग्रामनुसार हा सातबारा उतारा अन्य भाषांमध्ये असावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, या सूचनेचे पालन करत आता महाराष्ट्रात सातबारा उतारा मराठी, इंग्रजी, हिंदीसह २४ भाषांमध्ये उपलब्ध झाला आहे. शासनाने घेतलेल्या या कौतुकास्पद निर्णयामुळे आता राज्यातील प्रत्येक जमीनमालकाला मग तो मराठी भाषिक नसला तरी देखील सातबारा उताऱ्यातील माहिती कळणे शक्य होणार आहे. Land Records News
या संदर्भात जमाबंदी आयुक्तालयाने ‘सीडॅक’ या सरकारी संस्थेकडून ट्रान्सलिटरेशन टूल विकसित करून घेतले आहे. यामुळे सातबारा उताऱ्यातील मजकूर जसाच्या तसा उपलब्ध झालाच; पण भाषांतर झाल्याने त्यातील त्रुटी दूर झाल्या. आता मध्य प्रदेश, पंजाब राज्यानेही या संदर्भात कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. Land Records News
महसूल विभागाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्य संचालक सरिता नरके म्हणाल्या की, २४ भाषांमध्ये सातबारा उपलब्ध करून दिल्याने प्रत्येक जमीनमालकाला सातबारा उताऱ्यातील माहिती कळणे शक्य होणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या वेबसाइटवरून ऑप्शनमध्ये भाषा निवडल्यास संबंधिताला त्यांच्या भाषेमध्ये सातबारा उतारा डाउनलोड करता येईल. Land Records News