पुणे : महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार आणि प्रसार सुरु आहे. या योजनेचा आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. असे असताना या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म आला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजून पर्यंत अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे. व्यवस्थित आणि अचूकपणे भरल्यास तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे नक्की जमा होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
नवीन अर्ज कसा भराल ?
नवीन अर्ज भरण्यासाठी प्रथम तुम्ही ladkibahin.maharashtra.go.in या पेजला भेट द्यायची आहे. या पोर्टलवर आल्यानंतर प्रथम तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नवीन असल्यास खाते तयार करा, या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत टाईप करा. मोबाईलचा नंबर टाकून पासवर्ड सेट करा. जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर क्लिक करा. नसेल तर लागू नाही, यावर क्लिक करा.
ऑथोराईज्ड पर्सनमध्ये तुमच्या प्रोफेशनुसार विकल्प निवडा. टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक करून अॅक्सेप्ट करा. त्यानंतर कॅप्चा भरा आणि साईन अपवर क्लिक करा. त्यानंतर तुमचं साईन इन यशस्वी होईल. त्यानंतर लॉग इन पर्यायावर क्लिक करा. अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा. आधारकार्ड नंबर टाकून कॅप्चा भरा आणि व्हॅलिडेटे वर क्लिक करा. मग तुमचा फॉर्म ओपन होईल. त्यात महिलेचं संपूर्ण नाव इंग्रजीत लिहा. कॉलममध्ये वडिलांचे नाव लिहा. विवाहित असल्यास पतीचे नाव लिहा. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इंग्रजीत लिहा. वैवाहिक स्थितीचाही पर्याय निवडा.
आधारकार्ड प्रमाणे जन्मतारखेची नोंद करा. जन्मस्थान महाराष्ट्र असल्यास होय या पर्यायावर क्लिक करा. महाराष्ट्रात जन्म झाला नसल्यास ज्या इतर राज्यात जन्म झाला असेल त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही कागदपत्रे अपलोड करा. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधारकार्डप्रमाणे लिहा. पिनकोड लिहा. आणि जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका/नगरपालिका निवडा. जो मतदारसंघ असेल, तो बिनचूक निवडा. तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक टाका. तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला अर्जाबाबत मेसेज येतील.
शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आधारकार्डवर ज्या बँकेचे खाते लिंक आहे, त्या बँकेचा खाता क्रमांक भरा. बँकेची इतर माहिती भरा. आयएफएससी कोड भरा. बँक खाते आधारकार्डशी लिंक असेल, तर होयवर क्लिक करा. जर आधारकार्डसोबत बँक खाते जोडलं गेलं नसेल, तर ते लिंक करून घ्या. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी. आधारकार्डच्या समोरील बाजू पहिल्या पर्यायात अपलोड करा. दुसऱ्या पर्यायात आधारकार्डची मागील बाजू अपलोड करा.
तुम्ही अधिवास प्रमाणपत्र मध्ये तुमच्याकडे असलेला दाखला अपलोड करू शकता. केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास बरोबर पर्याय निवडा. रेशनकार्डची पहिली आणि दुसरी बाजू अपलोड करा. नसेल तर नाहीवर क्लिक करून उत्पन्नाचा दाखला अपलोड करा. अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करा. ते नसल्यास ऑनलाईन डाऊनलोड करा. हमीपत्रा मधील प्रत्येक पर्यायावर वाचून तो पर्याय तुम्हाला लागू होत असल्यास टीक मार्क करा आणि सही करा. त्यानंतर अगदी शेवटी बँक पासबूक आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे. आणि डिक्लेरेशनवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करा. हमीपत्र स्विकारा यावर क्लिक करा आणि अर्ज तपासून घ्या.
दरम्यान, तुम्ही जर व्यवस्थित फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अत्यंत लाभदायी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या गरजांसाठी आर्थिक मदत मिळते व त्यांना स्वावलंबनाची संधी मिळते. अर्ज प्रक्रिया सोपी असून, योग्य कागदपत्रे आणि माहिती भरून महिलांना योजनेचा फायदा घेता येऊ शकतो.