Student Viral Video: शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ असलेला एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रायगड येथील खोपोली गावातील आहे. या व्हिडिओत एक शाळेतील विद्यार्थींनी ऑटो रिक्षा चालवताना (School Girl Stunt) दिसत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पालकांना चांगलेले झापले आहे.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक शाळेकरी विद्यार्थ्यींनी शाळेय विद्यार्थ्यांनी भरलेली ऑटो रिक्षा चालवताना दिसत आहे. प्रत्यक्ष चालक तिच्या शेजारी बसला असून सदर विद्यार्थींनी ऑटो रिक्षा चालवत आहेत. एकाने या घटनेचा मोबाईलमध्ये कैद केला. गेल्या दोन दिवसांपासून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांना पालकांवर संताप व्यक्त केला आहे.
खोपोलीतील या व्हिडिओमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शालेय मुलांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे. व्हिडिओत दिसल्यामुळे ऑटोत शालेय गणवेश घातलेली मुले बसली आहेत. तर चिमुकल्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बेकायदेशीर कृत्याचा निषेध सोशल मीडियावर केला जात आहे. रिक्षा चालकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.
𝕂ℍ𝕆ℙ𝕆𝕃𝕀 | A disturbing video has emerged from Khopoli, showing a minor schoolgirl driving an auto-rickshaw with several students on board. The footage shows the young girl behind the wheel, while the driver sits beside her. The Khopoli Police have taken swift action,… pic.twitter.com/qNh6NuSRDT
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) November 11, 2025
या बेपर्वा आणि निष्काळजीपणामुळे मुलांचे जीव धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणी रिक्षाचा क्रमांक नोंद करून चालकावर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर पालकांमध्ये घबराट निर्माण झाली. या घटनेनंतर पोलिसांनी देखील पालकांना अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास बंदी घालण्याचे आवाहन केले.





