Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nithari Case: देशाला हादरवणारं निठारी हत्याकांड! घरामागील नाल्यात सापडले होते 8 मुलांचे सांगाडे; 18 वर्षांनंतर आरोपीची निर्दोष मुक्तता

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 11 November 2025, 17:52
Nithari Case: The Nithari massacre that shook the country! Skeletons of 8 children were found in the drain behind the house; Accused acquitted after 18 years

Photo-Social Media

दिल्ली: देशाला हादरवून सोडणाऱ्या निठारी हत्याकांडातील (Nithari Case) मुख्य आरोपींपैकी एक (Delhi News) असलेल्या सुरेंद्र कोळीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (11 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने त्याची क्युरेटिव्ह याचिका मंजूर करत त्याला तुरुंगातून मुक्त करण्याचा मार्ग मोकळा केला. तब्बल 18 वर्षांनंतर सुरेंद्र कोळी आता कारागृहाबाहेर येणार आहे. या निर्णयाने 2006 च्या निठारी हत्याकांडाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली असून पीडितांच्या कुटुंबीयांत संतापाचे वातावरण आहे.

 

सुरेंद्र कोळी आणि मोनिंदर सिंग पंढेर यांच्या निठारी गावातील घरामागे 29 डिसेंबर 2006 रोजी नाल्यात आठ मुलांचे सांगाडे सापडले होते. ही भयंकर घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. यानंतर पोलिस तपासात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. निठारी गावात या काळात भीतीचं सावट पसरलं होतं. “त्या दिवसांत कोणीही आपल्या मुलींना एकटं बाहेर जाऊ देत नव्हतं,” सर्व स्थानिक घाबरलेल्या मनःस्थितीत होते.

कोळीला या हत्यांपैकी एका प्रकरणात दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती, तर 2014 मध्ये त्याची पुनर्विचार याचिका फेटाळली गेली. मात्र, जानेवारी 2015 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याच्या दया याचिकेवरील विलंबाचा दाखला देत मृत्युदंड हा जन्मठेपेत बदलला. त्यानंतर 2023 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोळी आणि पंढेर या दोघांनाही अनेक प्रकरणांत निर्दोष मुक्त केलं.

सीबीआय आणि पीडित कुटुंबांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, मात्र 30 जुलै 2024 रोजी न्यायालयाने सर्व 14 याचिका फेटाळून टाकल्या. आता, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. आर. गवई, सूर्यकांत आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने कोळीची क्युरेटिव्ह याचिका स्वीकारत त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे.

सुरेंद्र कोळीला निठारीतील एकूण 12 प्रकरणांत निर्दोष मुक्तता मिळाली आहे, तर मोनिंदर सिंग पंढेर दोन प्रकरणांत सुटला आहे. कोळीच्या सुटकेनंतर पीडितांच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आमच्या मुलांचा न्याय अजूनही अधांतरी आहे,” असं एका पीडित आईने माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान, सीबीआय या निर्णयावर पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07
Next Post

Snake Viral Video: कार चालवाना अचानक साईड मिररमधून बाहेर आला साप, भररस्त्यात खळबळ, पहा VIDEO

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.