अलिबाग: अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे १४ जून २०२४ रोजी, सकाळी ११ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली असून इछूक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांच्याकडे ०६ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार, समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली आहे.