ठाणे: ठाण्यामध्ये पत्नीच्या विरहात व्यसनाधीन होऊन खर्च भागवण्यासाठी चोरी करणाऱ्यास पोलिसांनी अटक अटक केली आहे. शबाब हुसेन नायाब हुसेन रिझवी सय्यद असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याला नौपाडा पोलिसांनी रिक्षाचोतिच्या प्रकरणात अट केली आहे. त्याच्याकडून 4 रिक्षांसह 3 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ठाण्यासह मुंबईत देखील त्याने चोरीचे गुन्हे केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
शबाब हुसेन याचं एम.कॉम. पर्यंतचं शिक्षण झालं आहे. शेखने शिक्षण पूर्ण केल्यानंतर दुबईतील एअरपोर्टवर चालक म्हणून काम सुरू केलं. तो दुबईत असताना त्याची भारतात राहणारी पत्नी त्याला सोडून गेली. याच नैराश्यातून तो व्यवसानाच्या आहारी गेला. व्यसनाचा खर्च भागवण्यासाठी तो चोरी करण्यास प्रवृत्त झाला.
आरोपी शेख याने यू-ट्युबवर व्हिडिओ पाहून रिक्षा चोरी करण्यास सुरुवात केली. रिक्षाची चोरी केल्यानंतर तो पेट्रोल किंवा इंधन संपेपर्यंत रिक्षा चालवायचा. प्रवासी वाहतूक करून मिळालेल्या पैशांची तो नशा करत होता. पेट्रोल संपले की ती रिक्षा सोडून देऊन नवीन रिक्षा चोरत होता, असे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले.
दरम्यान, नौपाडा येथील रहिवासी मोहमद जमाल शेख यांची रिक्षा 30 मार्चला चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शेख याला अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.