रायगड : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने रणधुमाळी जोरात सुरु आहे. त्यातच महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरु असताना शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे चार उमेदवार जाहीर केले आहेत. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्याआधीच शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे ४ उमेदवार जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पनवेल, उरण, पेणमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत.
या चारही मतदारसंघात पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शेकापने अलिबागमध्ये मेळावा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत चार उमेदवारांची घोषणा केली. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली.
शेतकरी कामगार पक्षाचे रायगडमधील उमेदवार
1)अलिबाग – चित्रलेखा पाटील
2) पनवेल – बाळाराम पाटील
3) उरण – प्रितम पाटील
4) पेण – अतुल म्हात्रे