Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nilesh Rane: माजी खासदार निलेश राणे राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय का घेतला? समोर आलं कारण

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 24 October 2023, 19:55
Nilesh rane announced retirement from active politics

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अचानकपणे सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. निलेश राणे यांनी असा तडकाफडकी निर्णय का घेतला, याचे कारण आता समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्यावर नाराज असल्यानं निलेश राणेंनी हा राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र असलेले निलेश राणे माजी खासदार राहिले आहेत. पण, सध्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या राजकारणात इतरांची जास्त ढवळाढवळ होत असल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांचे भाजपच्या नेत्यांसोबत खटके उडत होते. माजी खासदार निलेश राणे यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे बडे नेते निलेश राणे यांची मनधरणी करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही असं ट्वीट आज सकाळी निलेश राणे यांनी केलं होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. निलेश यांनी आपल्या कुटुंबियांनाही याची कल्पना न देता निवृत्तीचे ट्वीट केले. निलेश राणेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमघ्ये नाराजी पसरली असून समर्थक लवकरच निलेश राणेंची भेट घेणार आहेत.

नमस्कार,

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.

मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम…

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 24, 2023

 

निलेश राणेंनी नेमकं काय म्हटले?

निलेश राणे म्हणाले, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या एकोणीस-वीस वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
A revolver held by two anonymous hands is fired on a black background.

Wagholi News : पिझ्झा उशिरा दिल्याने डिलिव्हरी बॉय वर गोळीबार ; वाघोलीतील धक्कादायक घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.