भिवंडी : गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलीस हद्दपारची कारवाई करतात. भिवंडी शहरात असे काही हद्दपार केलेले आरोपी बिन बोभाटपणे वावरत असल्याचे समोर येत आहे. शहरात दोन वेगवेगळया पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिघा हद्दपार केलेल्या आरोपींना शहरात विनापरवानगी वावरत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतील कल्याण रोड नविबस्ती नेहरूनगर येथील चाळीत राहणारा आवेश अब्दुल खालीद मोमीन यास ३० एप्रिल पासून एक वर्षां करता ठाणे, बृहन्मुंबई, मुंबई उपनगरे व पालघर या जिल्हयांमधून हद्दपार करण्यात आले असताना, तो कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय हद्दपार आदेशाचा भंग करून गौतम कंपाऊंड, नवीवस्ती येथे आढळून आला.