पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ दिवस आई-वडील आणि बहिणीशी संपर्क झाला नाही. मनात हजार शंका उपस्थित झाल्या होत्या त्यामुळे मुलाने थेट पालघर गाठलं. घरचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि मनात उठणाऱ्या शंकाना वाव मिळाला, घरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती.
..अणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
नेमकं काय झालं आहे समजत नव्हतं. घरात शोधा शोध सुरू झाली अणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आई-वडील आणि बहिणीचा मृतदेह कुजलेल्या स्थिती होते. आई आणि बहिणीचा मृतदेह कपड्यात झाकून ठेवले होते तर वडिलांचा मृतदेह बातरूममध्ये आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या तिघांचे कुजलेले मृतदेह जे.जे. रूग्णालयात पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पुढील तपास वाडा पोलिस करत आहेत.
नेमकं काय घडलं?
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळून आले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. वाडा तालुक्यातील नेहरोली ग्रामपंचायत हद्दीत बोन्द्रे आळीत गेल्या पंचवीस वर्षांपासून गुजरातचे राठोड कुटुंब राहात होते. त्यांचा मोठा मुलगा सुहास हा गुजरात येथे तर लहान मुलगा पंकज विरारला राहत आहे.
तेरा दिवसांपासून घरच्यांसी संपर्क नाही..
गेल्या तेरा दिवसांपासून घरच्यांसी संपर्क होत नसल्याने सुहास राठोड हा गुजरातहून नेहरोली वडिलांच्या घरी पोहोचला. घराला टाळे असल्याने घरात काही मिळतय का या आशेने ग्रामस्थांच्या मदतीने टाळे तोडले. घरात प्रवेश करताच कुजल्याचा वास येऊ लागला. शोधा शोध केली असता वडील मुकुंद राठोड यांचा मृतदेह बाथरूम मध्ये आढळून आले, तर आई कांचन व बहीण संगीता या दोघींचे मृतदेह वर कपड्यांचे थर टाकून लपविण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या तिघांचे कुजलेले मृतदेह जे.जे. रूग्णालयात पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पुढील तपास वाडा पोलिस करत आहेत.