Jitendra Awhad TMC Election: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या दोन महिन्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता आव्हाड कधी काळच्या कट्टर समर्थकाविरोधात आता स्वत: मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहेत.

पत्नी ऋता आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऋता आव्हाड या सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांचा परिसरात मोठा जनसंपर्क आहे. त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने स्थानिक राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक गावात शेताच्या पाण्याच्या वादातून दोघांना मारहाण….
मिलिंद पाटील यांच्या विरुद्ध…
ऋता आव्हाड या कळवा प्रभाग क्रमांक 23 मधून लढण्याची तयारी करीत असल्याची माहिती मिळत आहे. आता याचं प्रभागातून जितेंद्र आव्हाड यांचे कधीकाळचे कट्टर समर्थक मिलिंद पाटील नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी आव्हाडांची साथ सोडून मिलिंद पाटील यांनी काही नगरसेवकांसह धनुष्यबाण हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडलं होत. मात्र आता आव्हाड स्वतः त्यांचे पूर्वीचे कट्टर समर्थक विरोधात मैदानात उतरले आहेत.
यामुळे ऋता आव्हाड आणि मिलिंद पाटील यांच्यात होणारी संभाव्य लढत ही हायव्होल्टेज होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा: मतं मिळवण्यासाठी आटापिटा..! मतदारांना 50 टक्क्यांत वस्तुंच वाटप; पुण्यातल्या ‘या’ भागात मतदारांना प्रलोभन







