Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

India vs Pakistan: पाकिस्तानकडून टीम इंडियाचा 48 धावांनी धक्कादायक पराभव अन् तिलक वर्माचा संताप

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 November 2026, 8:29

क्रीडा वृत्त : रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत ‘अ’ संघाला पाकिस्तान ‘अ’ संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने भारतावर 48 धावांनी विजय मिळवत स्पर्धेत महत्त्वाचे यश मिळवले. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार तिलक वर्माने शानदार शतक झळकावले. मात्र, त्याची मोठी खेळीही संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. त्यामुळे सामन्यानंतर त्याने वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाचा विजय अधिक महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

या सामन्यात पाकिस्तान ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करत 49.2 षटकांत सर्वबाद 313 धावा केल्या. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या 26 धावांमध्ये भारताचे 2 फलंदाज बाद झाले. त्यानंतर अभिषेक शर्माने 70 धावांची आक्रमक खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कर्णधार तिलक वर्मानेही संयमी फलंदाजी करत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या.

शाहबाज अहमदसोबत त्याने महत्त्वाची भागीदारी केली. मात्र, निर्णायक क्षणी शाहबाज बाद झाल्याने भारताची अडचण वाढली. अखेर भारतीय संघाला विजयापासून 48 धावा दूर राहावे लागले.

सामन्यानंतर तिलकने फलंदाजांमधील भागीदारी तुटणे हे पराभवाचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. शाहबाज आणखी काही षटके मैदानावर टिकला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असे त्याने नमूद केले.

तिलकने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचेही कौतुक केले. त्यांनी सुरुवातीला चेंडू स्विंग होत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्यामुळे ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या, असे त्याने सांगितले.

या सामन्यात तिलकने 149 चेंडूंत शतक पूर्ण केले. मात्र, संघ जिंकला नसल्याने या खेळीचे त्याला विशेष समाधान नव्हते. वैयक्तिक शतकापेक्षा संघाला विजय मिळवून देणे महत्त्वाचे असल्याचे त्याने स्पष्ट केले. कर्णधार म्हणून सामना शेवटपर्यंत नेण्याची जबाबदारी आपली असल्याचेही त्याने सांगितले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

India vs Pakistan: पाकिस्तानकडून टीम इंडियाचा 48 धावांनी धक्कादायक पराभव अन् तिलक वर्माचा संताप

Monday, 23 November 2026, 8:29

बिस्लेरीच्या पाण्यात आढळले कर्करोगाचा धोका वाढवणारे रासायनिक घटक; तपासणीत धक्कादायक बाब उघड

Monday, 23 November 2026, 8:21

Maharashtra Weather: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पाऊस पडणार की थंडी वाढणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Monday, 23 November 2026, 8:08

कुलदेवतेची कृपा कोणावर होणार? कुणाला मिळणार आर्थिक लाभ, तर कुणाच्या अडचणी वाढणार? वाचा 23 नोव्हेंबरचे राशिभविष्य

Monday, 23 November 2026, 7:35

खराडीत विनापरवाना मद्यविक्री आणि मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई

Sunday, 22 November 2026, 23:10

फुरसुंगीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध

Sunday, 22 November 2026, 21:41
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp