Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 November 2026, 21:41

फुरसुंगी, ता. 22 : शरीराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर फुरसुंगी पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कठोर कारवाई केली आहे.

प्रणव महादेव शिंदे (वय 23, रा. के.के. हाईट्स, गजानन नगर, पावर हाऊस, भेकराईनगर, फुरसुंगी) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला एक वर्षासाठी चंद्रपूर जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव शिंदे याच्याविरुद्ध यापूर्वी हडपसर, फुरसुंगी आणि खराडी पोलीस ठाण्यांत शरीराविरुद्ध तसेच इतर गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दरोड्याची तयारी, शस्त्र बाळगणे, मारहाण, धमकी, बेकायदा जमाव जमविणे तसेच जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, दाखल गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर आल्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसत नव्हता. तो वारंवार शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर फुरसुंगी पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा सखोल आढावा घेत एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजुरी देत प्रणय शिंदे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करून चंद्रपूर जिल्हा कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवाना केले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे, पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे, पोलीस हवालदार महेश उबाळे, नंदू चव्हाण आणि पोलीस अंमलदार चेतन साळुंखे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खराडीत विनापरवाना मद्यविक्री आणि मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई

Sunday, 22 November 2026, 23:10

फुरसुंगीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध

Sunday, 22 November 2026, 21:41

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असतानाही लोणी स्टेशन परिसरात फिरणाऱ्या अट्टल गुन्हेगार फिरोज शेखला अटक

Sunday, 22 November 2026, 20:56

पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; सहा आरोपी जेरबंद, दोन अल्पवयीन ताब्यात

Sunday, 22 November 2026, 20:54

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये FDA ची धडक कारवाई; ९६ खाद्य आस्थापनांची तपासणी, १२ परवाने व नोंदणी निलंबित

Sunday, 22 November 2026, 20:39

LPG गॅस सबसिडी बंद होण्याची भीती दाखवून सायबर फसवणूक; ICICI बँकेचा ग्राहकांना इशारा

Sunday, 22 November 2026, 20:29
Next Post

खराडीत विनापरवाना मद्यविक्री आणि मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp