सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरु असून राजकीय नेते एकेमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या, असे विधान भाजपचे नेते नारायण राणे यांनी केले. ते शुक्रवारी निलेश राणे यांच्या प्रचारासाठी कुडाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
कुडाळ तालुक्याची ही भाजपची भव्य बैठक असून निलेश राणे निवडून येणे आवश्यक आहे, हे मी सर्वांना सांगितले आहे. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून व्हा निलेश राणे हे आमदार होतील, यामध्ये काहीच शंका नाही. सिंधुदुर्ग जिल्हा राज्याच्या राजकारणात फार झळकतोय आहे. सर्वांचे आपल्याकडे लक्ष लागले असून सर्व विरोधक टीका करत आहेत. ही टीका वैयक्तिक नसून आपल्या विकासावर आहे, असे नारायण राणे यांनी यावेळी म्हटले.
ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याला शोभत नाही..
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी केला आहे. उद्धव ठाकरे यांची भाषा सुसंस्कृत नाही, ते शिव्या देतात. ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याला शोभत नाही. उद्धव ठाकरे यांची भाषा संस्कृत नसून बाळासाहेबांच्या घराण्याच्याला अशी भाषा शोभत नाही. शिव्या देतात. महाराष्ट्रात शिवसेनेचा एखादा कार्यकर्ता नावारुपाला येत असेल तर त्याला सोडून लावण्याचा आणि कमजोर करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. नारायण राणे, छगन भुजबळ असे अनेक नेते आहेत. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात काम केले आणि आता म्हणतोय की पुन्हा मला मुख्यमंत्री करा. कोण देईल सत्ता यांना?, असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारला आहे.
विकासावर आणि मराठा आरक्षणावर बोलू नका…
शरद पवार याचं वय 83, 84 इतकं आहे. तरीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास पाहून त्यांना असह्य झालं आणि त्यांनी टीका केली. राणेंच्या दोन्ही मुलांवर संस्कार नाहीत, अशी टीका केली. मात्र, माझ्या घरात त्यांच्यावर संस्कार झाले. मी देखील पवारांची कुंडली काढली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही देखील राजकारणात आहोत. पवार साहेब तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता. विकासावर आणि मराठा आरक्षणावर बोलू नका, असे नारायण राणे यांनी म्हटले.