नवी मुंबई: भरधाव टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात टँकरच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने स्कुटीचालक तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी खैरणे येथे घडली. या अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या टँकर चालकाचा शोध सुरू केला आहे. या अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव रिया उपलकर (२५) असे असून ती वाशी सेक्टर २ मधील गणेश मंदिराजवळ राहण्यास होती. तसेच एका खाजगी बँकेमध्ये कामाला होती. सोमवारी दुपारी रिया आपल्या स्कुटीवरून पावणे एमआयडीसीमध्ये कामानिमित्त गेली होती.