पनवेल : तोंडरे गावातील एका शेतकऱ्याच्या जमिनीवरील वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या वतीने तळोजा पोलीस स्थानकामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तोंडरे गावातील एका शेतकऱ्याच्या जमिनीवरील आंबा, केळी, शेवगा अशी १२ झाडे अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांनी तोडली होती.
याबाबतची तक्रार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे आल्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात तळोजा पोलीस स्थानकांमध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका हद्दीतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक असते. संबंधित ठिकाणी तोडलेल्या झाडांपैकी काही झाडे ही भाजीवर्गीय असून त्याविरोधात तक्रार करता येत नाही.