Eknath Shinde : विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते राजापुरातून बोलत होते. तसेच पुढे म्हणाले, गुवाहाटीला असताना दीपक केसरकर यांनी उत्तम भूमिका बजावल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना म्हणाले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवसेनेची दोन फुफ्फुसं आहेत. सुरुवातीपासूनच कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. विघ्नसंतुष्ट लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही तत्वासाठी लढाई केली आहे. असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आमची भूमिका चुकीची असते, तर जनतेने पाठ फिरवली असती. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा मोठं नाव असतं. ते जपायचं असतं. बाळासाहेब ठाकरेंचं विचार हीच आमची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि विचार पुढे न्यायचं आहे. बाळासाहेबांचं विचार हीच आमची संपत्ती होय, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.