मुंबई : रायगड जिल्ह्या धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मुलीने स्वत:च्या आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार खालापूर तालुक्यात घडला आहे. खालापूर तालुक्यातील परखंदे येथील धनगरवाडामध्ये मुलीने जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी घडली होती. संगीता मारुती झोरे, अशी मृत महिलेची ओळख आहे. तरूणी प्रियकरासोबत शरीरसंबंध होते. या प्रकाराची माहिती आईला कळली आणि आईने तिला रंगेहाथ पकडल्यामुळे तरूणीचा राग अनावर झाला आणि त्यातून रागाच्या भरात या तरूणीने आईचा खून केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुलीने आपल्या आईची हत्या केली आहे. आईच्या हत्या केल्याप्रकरणी खालापूर पोलिसांकडून मुलगी भारती आणि तिचा प्रियकर संतोष दत्तात्रेय नांदगावकर यांना अटक करण्यात आले आहे. खालापूर न्यायालयाने या दोघांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संगीता झारे त्यांच्या दोन मुलींसह धनगरवाडामध्ये राहत होत्या. त्यांची मोठी मुलगी भारतीचे वावोशीतील संतोष नांदगावकर नावाच्या तरूणासोबत प्रेम प्रकरण आहे. ती त्याला भेटण्यासाठी अनेकदा तिच्या घरी जात होती.
असा रचला आत्महत्येचा बनाव..
१० सप्टेंबर रोजी तरूणीचा प्रियकर संतोष हा तिच्या घरी आला होता. रात्रीच्या वेळी दोघांना तरूणीच्या आईने एकत्र पाहिले. नंतर आई ओरडेल या भितीने भारती आणि संतोष यांनी तिला खाली पाडलं. नाकावर घोंगडीने दाब देत आईची हत्या केली. घटनेनंतर त्यांनी आईने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. संगीता यांचा मृतदेह घरामधील चुलीच्या ठिकाणी असलेल्या पाइपला साडीचा फास लावून लटकवला होता. परंतु या दोघांनी केलेल्या भयंकर कृत्याची भारतीची लहान बहीण ही साक्षीदार होती. त्यामुळे आरोपी तरूणीच्या लहान बहिणीने हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे या दोघांचं कृत्य उघड झालं आणि ताण अटक करण्यात आली.