सिंधुदुर्ग: जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या फोंडा घाटाला बसला आहे. या घाट मार्गावर एक भला मोठा खड्डा पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या घाटातून अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करूळ घाट नूतनीकरणाच्या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहतूक याच फोंडाघाटातून मार्गस्थ होत आहे. परंतु, आता या घाटातही वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला आहे