Alibaug crime : अलिबाग : पेण तालुक्यात आदिवासी बालिकेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. मळेघर आदिवासी वाडीत ही घटना घडली. आरोपीला जन्मठेप व ५००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आदेश पाटील असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. महत्त्वाचीबाब म्हणजे चिमुरडी अवघ्या तीन वर्षाची होती.
२० डिसेंबर २०२० ही घटना घडली होती. जिल्हा पोलिसांनी आरोपी आदेश पाटील याला अटक केली. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले.
सोमवारी १८ डिसेंबरला जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय एस. राजदेकर यांच्या न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ऍड. उज्वल निकम यांनी बाजू माडताना आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केली. त्यामुळे न्यायालय आरोपीस कोणती शिक्षा देते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. बुधवारी (दि २०) जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय एस. राजदेकर शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपी आदेश पाटील यास भारतीय दंड संहितेचे कलम ३७६ ए , ३७६ एबी तसेच पोस्को कायद्याचे कलम ६ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व ५००० हजार रुपये दंड जर दंड भरला नाही तर आणखी सहा महिने कारावास आशी सुनावली.