ठाणे : भिवंडी येथे मुंबई-नाशिक महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एका 8 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची ही घटना पडघा येथे घडली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहिताीनुसार, खडवली येथे सहलीसाठी गेलेल्या भिवंडीतील कुटुंबियांचा अपघात झाला. यामध्ये 10 ते 12 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. तर एका 8 वर्षीय चिमूकलीचा मृत्यू झाला आहे. या खासगी बसमध्ये एकूण 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीआहे. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकुन हा अपघात झाला.
अपघातातील सध्या जखमींना भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात 25 एप्रिल ल रात्रीच्या सुमारास घडला.








